नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - नाइट लाइफ हा शब्द मला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत काही ठरावीक ठिकाणी ‘नाइट लाइफ’ प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो, मात्र मला मुळातच नाइट लाइफ हा शब्द आवडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची घोषणा केली होती. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाइट लाइफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. नाइट लाइफ राज्यात सरसकट  राबवणे योग्य होणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शहराची स्वत:ची संस्कृती असते. माझ्या मतानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणी हा प्रयोग राबवता येऊ शकेल. मात्र मला ‘नाइट लाइफ’ हा शब्द आवडत नाही, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I hate the word nightlife uddhav thackeray