Maharashtra Politics: "फडणवीसांना बेड्या ठोका; त्या वक्तव्याचा मी साक्षीदार" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Maharashtra Politics: "फडणवीसांना बेड्या ठोका; त्या वक्तव्याचा मी साक्षीदार"

'महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली होती. तर प्रकाश महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन,’ असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

"ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं मी कोणताही काम केलं नव्हतं, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत" असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या व्यक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

तर पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी आम्ही चहापानाला गेलो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत त्यांची मानसिकता दिसून आली. मला त्यांना सांगायचे आहे की, दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली, असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.