मला बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचाय : आदित्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नवीन महाराष्ट्र मला घडवायचा

- आशीर्वाद घेवूनच मी मातोश्रीतून बाहेर पडलोय

पाचोरा (जि.जळगाव) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नवीन महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यांचा आशीर्वाद घेवूनच मी मातोश्रीतून बाहेर पडलो आहे. ही माझी तीर्थयात्रा आहे, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने पाचोरा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. 

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा जळगाव येथून सुरू झाली. पाचोरा येथे कृष्णाजीनगर मैदानात त्यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, की जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण महाराष्ट्राची तीर्थयात्रा काढली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा नवीन महाराष्ट्र घडविण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठीच आपण ही यात्रा काढली आहे. माझी कोणत्याही पदासाठी यात्रा नाही. मला जनतेचा आशीर्वाद हवा आहे. मला जनतेची मन जिकांयची आहेत. मने जिकंली तर राज्यही जिकंता येईल.

जिथे त्रास आहे त्या ठिकाणी शिवसेना मदत करते, अन्याय असेल तेथे न्यायासाठी शिवसेना धावून जाते यापुढेही शिवसेनेचे हे कार्य सुरूच राहिल. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते. ही यात्रा पुढे भडगाव येथे रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I want to make Maharashtra of Balasaheb Thackeray Thoughts says Aditya Thackeray