Mohit Kamboj : 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या मुलीचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

I Was the only GIRL With Mr Mohit Kamboj Woman revelation on Sanjay Raut accusation

Mohit Kamboj : 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या मुलीचा मोठा खुलासा

खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणीदेखील राऊत यांनी केली होती. दरम्यान, त्या रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या मुलीने ट्विट करत मोठा खुलासा केला आहे. (I Was the only GIRL With Mr Mohit Kamboj Woman revelation on Sanjay Raut accusation )

अक्षा कंबोज यांनी ट्विटरद्वारे मोहित यांच्यावर होणाऱ्या आरोपावर भाष्य केले आहे. अक्षा कंबोज म्हणाल्या की, कौटुंबिक मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही. खोट्या बातम्या, चुकीच्या अफवा कधीही टिकणार नाहीत असं तिने म्हटलं.

तर अक्षा कंबोज या मोहित कंबोज यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ट्विट करुन राऊतांना थेट उत्तर दिलं आहे. आता राऊत या प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्य सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत”, असा दावा त्यांनी केला आहे.

रात्री साडेतीन वाजता त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. “येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?” असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. “बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत”, असंही ते म्हणाले. “आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात”, असा सवालही कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Mohit Kamboj