पवारसाहेबांचा निर्णय मान्य : खासदार उदयनराजे

I will agree with Sharad Pawars decision for Candidacy says MP Udayan Raje
I will agree with Sharad Pawars decision for Candidacy says MP Udayan Raje

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक आहोत. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच इतर पक्षांमध्ये आपले मित्र आहेत, असे सांगत इशाराही त्यांनी दिला. 

मुंबई येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, शरद पवारांचे या बैठकीमध्ये मी आशीर्वाद घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे. स्थानिक पातळीवरुन मला विरोध नाही. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

दरम्यान, उदयनराजे यांच्या विरोधाचे वातावरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत स्थानिक नेते उदयनराजे यांचे नावाला पसंती देतात की दुसऱ्या उमेदवाराला आता लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com