मी अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना विचारणार: उद्धव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : राम मंदिर उभारण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विसरले आहे. गेल्या चार वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला गेले नाही. पण, मी येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना जाब विचारणार आहे, असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले - 
- राम मंदिराबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मत व्यक्त केले आहे
- राम मंदिर कधी बांधणार माहिती नाही
- मी अयोध्येला जाणार आहे, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार 
- मी तेथे जाऊन मोदींना विचारणार आहे, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका
- प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखांप्रमाणे राम मंदिर जुमला ठरू नये
- हा विषय श्रीरामाचा आहे, साधा विषय नाही
- चार वर्षांत पंतप्रधान एकदाही अयोध्येला गेले नाहीत, का?
- ज्या उत्तर प्रदेशमधून निवडून गेलात तेथे कधी गेला नाही
- एकदा सांगून टाका तुम्ही मंदिर बांधता की आम्ही मंदिर बांधू 
- नितीन गडकरी तु्म्ही मराठी आहात, खोटे बोलणे महाराष्ट्राची संस्कृती नाही
- शिवसेनाप्रमुख म्हणायचे शब्द द्यायचा असेल तर विचार करून दे
- तुम्ही निर्लज्जपणा करत आहात, हा तुम्हाला शोभत नाही
- लोक आता दिलेल्या वचनांबद्दल विचारत आहेत, काय उत्तर देणार
- तुम्ही दिलेली आश्वासने विसरला तरी आम्ही विसरणार नाही

Web Title: I will go to Ayodhya and ask Modi from there: Uddhav