'आवश्‍यकता वाटल्यास राधे मॉंवर फौजदारी करा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे मॉं ऊर्फ सुखविंदर कौरवर आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवून आवश्‍यकता वाटल्यास राधे मॉंवर योग्य ती कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

निक्की गुप्ता यांनी राधे मॉंच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केली आहे. आपले सासू-सासरे राधे मॉंचे भक्त आहेत. तिच्या चिथावणीमुळेच ते आपला हुंड्यासाठी छळ करतात, असे निक्की यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल बोरिवली पोलिसांनी घेतली नाही.

न्या. साधना जाधव यांच्यापुढे निक्की यांच्या याचिकेची सुनावणी झाली. पोलिसांनी निक्की यांचा जबाब नोंदवावा आणि आरोपांत तथ्य असल्यास कायद्याने योग्य असेल ती कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी राधे मॉंविरोधातील आरोप नाकारले असले, तरी आता ते आवश्‍यकता वाटल्यास फौजदारी कारवाई करू शकतात, असेही न्या. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: If necessary, take the charge of Radhe maa