Sharad Pawar : "पवारांना माहिती असतं तर पवार-फडणवीस सरकार दोन दिवसांत पडलं नसतं" If Pawar had known, the Pawar-Fadnavis government would not have fallen in two days Ashok Chavan comment on Pawar fadanvis early morning oath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar : "पवारांना माहिती असतं तर पवार-फडणवीस सरकार दोन दिवसांत पडलं नसतं"

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकतंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले. राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

यासंबधी प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसांत पडलं नसतं, असं सांगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

तर जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर आहे त्याचा एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या, अशा शब्दात भाजपच्या मिशन महाविजयचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. नागपुरात चव्हाण म्हणाले की, ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहत होतो. शरद पवार यांनी आमदारांना फोन करून परत बोलावले. ताकीद दिली. ही आपली भूमिका नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकतंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपात शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजपने शरद पवार यांना उत्तर दिले आहे. "शरद पवार साहेब खर तर, 'सत्य-असत्य' बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. पवार साहेब, तुम्ही राजकारणात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच खोट्याचा आधार घेत इथपर्यंत आलात. तुमचा इतिहास हेच सांगत आहे की, तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वासघात करूनच स्वतःला सिद्ध केलात," असे भाजपने म्हटले आहे.