जर त्यांचे खोके काढले तर..., एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला

कनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिले
जर त्यांचे खोके काढले तर..., एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला

Eknath Shinde: राज्यात मागील काही दिवसांपासू महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. राज्याबाहेर गेलेले उद्योग आणि पेटलेला सीमाप्रश्न यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यात येत आहे.

जर त्यांचे खोके काढले तर..., एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
एकनाथ शिंदे जागे व्हा! तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण सल्ला

यादरम्यान विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्यावतीने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज रविवार, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषेदेत बोलताना अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.

जर त्यांचे खोके काढले तर..., एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
Ajit Pawar : विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार, अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले..

शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की आम्ही कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. तर फक्त जेवढा निधी होता. त्याच्या पेक्षा जास्त रूपयांचे टेंडर काढण्यात आलं होत. त्याला फक्त स्थगिती दिली आहे. तर अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यवर टीका करताना खोके सरकार म्हणून हिणवलं होतं. त्याला उत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले अजित दादांच्या तोंडून ही भाषा शोभनारी नाही. जर त्यांचे खोके काढले आणि एकावर एक ठेवले तर नजर देखील पोहचणार नाही. असं म्हणंत शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

तर शिंदे-फडणवीस सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत, या अधिवेशनात नवीन लोकायुक्ताचं विधेयक मांडणार आहोत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनासुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम हा लोकायुक्त कायदा करणार आहे. या लोकायुक्तात हायकोर्टाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश असतील. तर कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायदा सामील करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com