अरे वाह! पोस्टामधील 'ही 'योजना करेल पैसे डबल

money
money

पुणे : अनेकांना नेहमी कोणतं ना कोणतं संकट येतच असते. त्या संकटकाळामध्ये आपल्याला गुंतवणूक केलेल्याचा उपयोग करता येतो. परंतु काहीवेळेसआपली गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून आपल्याला त्यातून योग्य असा रिटर्न मिळेल, याचा आपण विचार करत असतो, बरोबर आहे ना. त्यासाठीच पोस्टाच्या काही योजना आहेत, या योजनांमुळे आपल्याला योग्य असा रिटर्न मिळेल आणि आपले पैसेसुद्धा सुरक्षित राहतील. त्यातीलच पोस्टाच्या अनेक  योजनांमधून अशी ही 'किसान विकास पत्र योजना' आहे. या योजनेतून पैसे डबल होतील. 

पोस्टमधील या योजनेमध्ये जे गुंतवणुक करणारे गुंतवणुकदार आहेत. त्या गुंतवणुकदाराचा पैसा सुरक्षित राहणार आहे. तसेच यामध्ये योग्य असा रिटर्न सुद्धा मिळण्याची हमी दिली जात आहे. किसान विकास पत्रयोजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो आहे. 

इंडिया पोस्टच्या वेबसाइटवरोल माहितीनुसार, किसान विकास पत्राची मॅच्यूरिटी ही 124 महिने आहे. ही एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेमध्ये ग्राहकांचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होत असतात. किसान विकास पत्र हे देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी गुंतवणूक 1000 रूपये तर जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. त्यामुळे या योजेनचा फायदा शेतकऱ्यांना घेता येतो.  

यांनाच करता येते गुंतवणूक... 

किसान विकास पत्रयोजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 18 असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्रच असते, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येऊ शकते. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येते. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या किसान विकास पत्रयोजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी तुमच्या मुलासाठी सुद्धा करू शकता. कारण याची देखरेख पालकाकडून केली जाते.  KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल.

इतका व्याजदर निश्चित ... 

सरकार हे प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करत असते. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यासाठी 6.9 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही एकर कमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळणार आहेत. 124 महिने या योजनेचा मॅच्यूरिटी कालावधी आहे. ही योजना इनकम टॅक्स अधिनियम 80सी अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो रिटर्न येईल त्यावर कर द्यावा लागणार आहे. तसेच या योजनेमध्ये टीडीएस कपात केले जात नाही.

ट्रान्सफर करण्याचीसुद्धा सुविधा... 

केव्हीपी ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केली जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधासुद्धा आहे. किसान विकास पत्र हे पासबुकच्या आकारात जारी केले जात आहे.

ही कागदपत्रे आहेत आवश्यक... 

यावेळी आपल्याला दोन पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबुक इ.) या कागदपत्रांची यावेळी गरज लागणार आहे. जर तुमची गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर यावेळी पॅन कार्डसुद्धा आवश्यक असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com