esakal | महाराष्ट्रात यायचं असेल तर दाखवावा लागणार कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात यायचं असेल तर दाखवावा लागणार कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल

विमानतळ, रेल्वे किंवा रस्ते वाहतूक करत असल्यास आपल्याला चेक पॉईंटवर आपला कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल दाखवावा लागेल. निगेटिव्ह अहवाल दाखवल्यानंतरच आपल्याला राज्यात प्रवेश देण्यात येईल.

महाराष्ट्रात यायचं असेल तर दाखवावा लागणार कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: महाराष्ट्र सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही कठोर नियम लागू केले आहेत. जेणेकरून पुन्हा राज्यात कोरोना वेग पकडू नये. एनसीआर-दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा यासारख्या कोरोना बाधित राज्यातून महाराष्ट्रात येण्याची तुमची इच्छा असेल तर प्रथम तुम्हाला कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. विमानतळ, रेल्वे किंवा रस्ते वाहतूक करत असल्यास आपल्याला चेक पॉईंटवर आपला कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल दाखवावा लागेल. निगेटिव्ह अहवाल दाखवल्यानंतरच आपल्याला राज्यात प्रवेश देण्यात येईल.

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम

  • प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी प्रवासाच्या 72 तासांच्या आत करुन घेणे बंधनकारक आहे.
  • प्रवाशांना त्यांचा निगेटिव्ह अहवाल प्रवासाबरोबरच ठेवावा लागेल. बोर्डिंग आणि सुटण्याच्या वेळी अहवाल तपासले जातील.
  • जर हा अहवाल काढला गेला नाही तर प्रवाशाला विमानतळावरच त्याची चाचणी स्वःखर्चाने करुन घ्यावी लागेल. विमानतळ प्राधिकरणाला प्रवाशाची संपूर्ण माहिती (पत्ता, मोबाईल नंबर इ.) घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळेल.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर प्रवाशांशी संपर्क साधून प्रोटोकॉल अंतर्गत उपचार केले जातील.

रेल्वे प्रवाशांसाठी नियम

  • जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर महाराष्ट्रात आगमन होण्याच्या 96 तासांच्या आत तुम्हाला आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करावी लागेल.
  • जर प्रवाशाकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल तर त्याचे आरोग्य तपासणी (शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी) रेल्वे स्टेशनवर केली जाईल. जर प्रवाशाला लक्षणे नसतील तर त्याला घरी जाऊ दिले जाईल.
  • जर एखाद्या प्रवाशाने कोरोनाची चिन्हे दर्शवली तर त्याला इतर प्रवाश्यांपासून वेगळे केले जाईल. आणि वेगवान चाचणी केली जाईल. हा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्याला घरी जाऊ दिले जाईल.
  • प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्यास त्याला त्वरित कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठवले जाईल.

रस्ते प्रवाशांसाठी नियम

राज्याच्या सीमेवरील इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चेकपोस्टवर आरोग्य तपासणी केली जाईल. शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी आणि काही आरोग्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

जर प्रवासी लक्षणे दर्शवत असेल तर त्याची जलद चाचणी केली जाईल. हा अहवाल निगेटिव्ह आला तर ठिक अन्यथा त्याला कोविड केअर सेंटर पाठवले जाईल. उपचाराचा खर्च फक्त प्रवाशांनाच करावा लागणार आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

If you want come Maharashtra you have show the negative report of Corona

loading image
go to top