बेकायदा दारू रोखा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात बेकायदा मद्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी ट्रॅक ऍण्ड ट्रेस प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबई - राज्यात बेकायदा मद्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी ट्रॅक ऍण्ड ट्रेस प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक बुधवारी झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचे सादरीकरणही करण्यात आले. बैठकीत "इज ऑफ डुईंग बिझनेस'नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवान्यांचे सुलभीकरण करणे, बेकायदा दारूविक्रीला पायबंद करण्यासाठी "व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम'चा वापर, डिजिटल तसेच भौतिक सुरक्षा माध्यमे वापरून मद्याचे गुणनियंत्रण करण्यात यावे, यावर चर्चा करण्यात आली.

Web Title: illegal liquor stop devendra fadnavis