बेकायदा वाहतुकीचे ‘राज्य’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात राज्याच्या परिवहन विभागाकडून कठोर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. राज्यात २०१६-१७ मध्ये केलेल्या कारवाईत ५२ हजार ५३ वाहने आरटीओच्या जाळ्यात अडकली; तर २००६-०७ मध्ये हाच आकडा ४१ हजार १५८ एवढा होता, अशी माहिती उघडकीस आली आहे.

मुंबई - बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात राज्याच्या परिवहन विभागाकडून कठोर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. राज्यात २०१६-१७ मध्ये केलेल्या कारवाईत ५२ हजार ५३ वाहने आरटीओच्या जाळ्यात अडकली; तर २००६-०७ मध्ये हाच आकडा ४१ हजार १५८ एवढा होता, अशी माहिती उघडकीस आली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवासी वाहने धावत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवेवर त्याचा मोठा परिणाम होतो. याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसतो. बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाई होत नसल्याची ओरड केली जाते. एकंदरीतच गांभीर्य लक्षात घेऊन आरटीओने काही वर्षांत यावर कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी सध्या राज्याकडे ५९ भरारी पथके आहेत. मोटार वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने भरारी पथकाची कामगिरी उत्तम होत आहे. गत काही वर्षांत केलेल्या कारवाईत हजारो बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने आरटीओच्या जाळ्यात अडकली आहेत. 

२०१६-१७ मध्ये पाच लाख २६ हजार ५१३ वाहने तपासण्यात आली. यात ५२ हजार ५३ वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळले. यातील ११ हजार २१५ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले; तर केलेल्या कारवाईतून १० कोटी ५९ लाख रुपये दंडही मिळाला आहे.

कारवाई केलेली वाहने
क्षेत्र                       वाहने
मुंबई                       १,७०९
ठाणे                 ५,५०३
पनवेल                  २,७५२
कोल्हापूर                ५,६६१
पुणे                        ४,८१७
नाशिक                ७,२१७
धुळे                 ५,९३७
औरंगाबाद               ५,२४९
नांदेड         ३,८९३
लातूर                     २,३०२
अमरावती               ४,०५८
नागपूर                   १,११९
नागपूर ग्रामीण          १,८३६

Web Title: illegal transport