‘रेल्वे प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वेलाइन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयी-सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. 

सह्याद्री अतिथिगृहात राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील अनेक मार्गांवर नव्याने रेल्वेलाइन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. सिडको, मुंबई विकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रश्‍न निकाली काढावा.

Web Title: immediate tasks of railway projects