भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - देश बदलत आहे, नोटाबंदी करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरू झाला आहे. तुम्ही देशाचे वर्तमान आहात. देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी तुमचे योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील नॅशनल स्पोर्टस क्‍लब ऑफ इंडिया येथे नाताळनिमित्त मुंबईतील 135 शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संदेश देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास अमेरिकेतील डॉ. पास्टर माल्डानाडो हे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की जग बदलत आहे, त्याचप्रमाणे भारत देशही परिवर्तनातून प्रगती करीत आहे. देश चांगल्या परिवर्तनाच्या पर्वात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आपण कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. हा क्रांतिकारी बदल आहे. यामुळे काळा पैसा हद्दपार होणार आहे. आपण सर्वांनी संपूर्ण योगदान देऊन एका सैनिकाप्रमाणे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Web Title: Important contribution to eliminating corruption