"राज्यपालांचे अधिकार तपासा..." ; सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी ठाकरे गटाची महत्वाची मागणी - Thackeray vs Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thackeray Vs Shinde Maharashtra power struggle key questions before supreme court decision

Thackeray vs Shinde : "राज्यपालांचे अधिकार तपासा..." ; सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी ठाकरे गटाची महत्वाची मागणी

Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गंटाला दिली आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. याशिवाय एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. २१ जूनपासून ज्या घटना घडत आहेत. त्या घटनांचा क्रम सर्वोच्च न्यायालयाने तपासावा. यावर कशाप्रकारे कारवाई होऊ शकते, याकडे विशेष लक्ष द्यावे. राज्यपालांचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाने तपासावे. तसेच सरकार कसे स्थापन झाले, याची चौकशी न्यायालयाने करावी, असे अनिल देसाई म्हणाले. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनिल देसाई म्हणाले, आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी सुरू असताना आयोगाने निकाल द्यायला नको होता. या निकालाचा सत्तासंघर्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

काल उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाव प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने अलोकतांत्रिक निर्णय घेत आहे, त्यावरून प्रश्न निर्माण होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा. न्यायाधीशांप्रमाणे निवडणूक आयुक्तांचीही नियुक्ती झाली पाहिजे, तोपर्यंत आयोगाचे काम सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.