Good-Evening
Good-Evening

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

जी-07 परिषदेत ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा झटका... माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांची 'एसपीजी' सुरक्षा काढली... सोने 40 हजारांकडे; विक्रमी वाटचाल सुरूच... मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- जी-07 परिषदेत ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-07 परिषदेत पाकिस्तानला मोठा झटका दिला असून भारत-पाक एकत्र येऊन चर्चा करू शकतात असे मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

- माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांची 'एसपीजी' सुरक्षा काढली

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुरक्षेचा आढावा घेतला जातो, त्यात मनमोहनसिंग यांना कोणताही धोका नसल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.

- चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; जामीनावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.

- आणखी 22 अधिकाऱ्यांवर सक्तीच्या निवृत्तीची कारवाई!

शासकीय अधिकाऱ्यांमार्फत होणारे भ्रष्ट व्यवहार आणि अनुचित प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

- सोने 40 हजारांकडे; विक्रमी वाटचाल सुरूच

डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला रुपया आणि जागतिक पातळीवर भावात झालेली वाढ देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची झळाळी आज वाढण्यास कारणीभूत ठरली. आज सलग पाचव्या सत्रात सोन्याच्या भावात वाढ नोंदविण्यात आली.

- राफेलसाठी आणखी तीन वर्षांचे वेटिंग?

या विमानांची पहिली तुकडी हाती आल्यानंतर त्यांचे भारतीय वैमानिक आणि अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आतापर्यंत तीन वैमानिक आणि दोन तांत्रिक अधिकाऱ्यांनाच या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- तमिळनाडूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

तमिळनाडूतील नागापट्टीणम जिल्ह्यातील वेदरनयाम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off

सिंधू दुःखी झाली होती पण ती खचली नव्हती. स्वतःला सावरत होते त्यातच तिने कॅरोलिनाची रॅकेट उचलून तिला दिली. अलिंगन देत तिचे अभिनंदन केले होते. सुवर्णपदकापेक्षा त्या क्षणाने सर्वांची मने जिंकली होती.

- INDvsWI : एक विजय आणि भारताने कमावले तब्बल 60 गुण

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा परदेशातील सर्वांत मोठा विजय आहे. याच विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 60 गुणांची कमाई केली आहे.

- अर्जुन कपूरच्या फोटोवर मलायकाने घेतली फिरकी, नेटकऱ्यांना आवरेना हसू!

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अंकाउंटवर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. पण, या  फोटोच्या कॅप्शनची सध्या इंटरनेटवर खूप चर्चा आहे. जाणून घ्या काय आहे कॅप्शन...

- #MotherTeresa मानवतेची मूर्ती मदर तेरेसा यांना जन्मदिनी जगभरातून अभिवादन

भारतरत्न मदर तेरेसा यांचा आज जन्मदिवस! कायम दुसऱ्याची सेवा आणि वंचितांना मदत करणे हेच ध्येय असलेल्या मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बानियामध्ये झाला.

- #InternationalDogDay भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदा म्हणाला होता, मी सामना हारलो किंवा जिंकलो तरी घरी गेल्यावर माझी कुत्री माझ्याशी वागताना कोणताच भेदभाव करत नाहीत. अगदी खरं आहे की नाही हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com