गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Good-Evening
Good-Evening

पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त

मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.

- पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा

जगातील सर्वाधिक अपघातांचा व वर्षाला दीड लाख अपघाती मृत्यूंचा देश, असा डाग लागलेल्या भारतात एक सप्टेंबरपासून नवा कायदा लागू झाला.

- झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणार? पंतप्रधान मोदींनी उचलले पाऊल

वादग्रस्त भारतीय मुस्लिम धर्मउपदेशक झाकीर नाईक याला जेरबंद करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केली आहे.

- हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा

कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'चा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य काही दहशतवाद्यांना सुधारित कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले.

- राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये लॉटरी; महाडिक, चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरुवार) खालील संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत.

- दगडुशेठच्या दर्शनाला येताय; पार्किंगची चिंता नाही आणि तेही मोफत

ठेकेदाराकडे थकबाकी वसुल करण्यासाठी वाहनतळ बंद करण्यात आले होते. उत्सवाची गरज लक्षात घेता 24 तास मोफत वाहनतळ सुरु करण्यात आले आहे.

- मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम

दक्षिण आफ्रिकेविरुदध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ आज निवडण्यात आले. मिताली राज एकदिवसीय तर हरमनप्रीत कौर ट्‌वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी कायम आहेत.

- Ashes 2019 : इसको बोलते कमबॅक; स्मिथचे शानदार शतक

ऍशेस मालिकेत सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने दमदार कमबॅक करत शतक ठोकले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक साजरे केले आहे.

- सारा अली खानचा हा फोटो बघून तुम्हालाही बसेल धक्का!

साराने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचा पूर्वीचा फोटो शेअर केलाय. ज्यात ती आणि तिची आई अमृता सिंग दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फोटोत सारा ओळखूच येत नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com