महत्त्वाची बातमी : 'सीईटी'ची परीक्षा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार परीक्षा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

सीईटी परीक्षेच्यावेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फेने 28 मार्चला घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 30 एप्रिलला घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता.१९) दिली. मंत्रालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सामंत बोलत होते.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सामंत म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परीक्षेच्यावेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- पुणेकरांनो इकडे लक्ष्य द्या; पुढील आदेश येईपर्यंत दुकाने राहणार बंद!

एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांबाबत 31 मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  काळजी करु नये, याबाबत शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले.

No photo description available.

- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनामुळे कॅन्सलेशन चार्जेस रद्द!

बैठकीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलचे अध्यक्ष जे. पी. डांगे, आयुक्त संदीप कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

- कच्च्या तेलाला मिळाला १६ वर्षांतील सर्वात कमी दर!

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news MCA CET exam postponed due to coronavirus