महाराष्ट्रात कोरोना लसीचे लाखो डोस जाणार कचऱ्याच्या डब्यात

Maharashtra nearly 2.4 lack Covid vaccine doses most likely gone in garbage bin
Maharashtra nearly 2.4 lack Covid vaccine doses most likely gone in garbage bin esakal

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) तब्बल 2.4 लाख कोरोना लसीचे डोस (Covid vaccine doses) कचऱ्याच्या (Garbage Bin) डब्यात जाणार आहेत. राज्याने जवळपास 40 हजार कोरोना लसीचे एक्सपायरी डेट (Expiry Date) उलटून गेलेले सोमवारी कचऱ्यात फेकून दिले. तर खासगी क्षेत्रातील जवळपास 2 लाख डोस देखील एक्सपायरी डेट उलटून गेल्याने येत्या 5 दिवसात कचऱ्याच्या डब्यात जातील. लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण आधीपेक्षा आता वाढत आहे. कधीकाळी कोरोना लसीच्या डोसचा (Corona Vaccine Dose) तुटवडा होता. लोकांना कोरोनाची लस मिळणे दुरापास्त झाले होते. आता लाखो डोस थेट कचऱ्यात जात आहेत.

Maharashtra nearly 2.4 lack Covid vaccine doses most likely gone in garbage bin
हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या, युक्रेनमध्ये भारतीय ठार झाल्यानंतर पवारांचं केंद्राला आवाहन

कोरोना लसीचे लाखो डोस वाया जाऊ नये म्हणून सध्या तरी राज्य सरकार (Maharashtra State Government) आणि खासगी क्षेत्रातील रूग्णालयांकडे कोणतीच उपाययोजना नाही. गेल्या दोन महिन्यापासून डोस वाया जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. राज्याला लसीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या कोल्ड चेनमध्ये (Cold Chain) त्रुटी राहण्याची भीती आहे. तर दुसऱ्या बाजूला खासगी क्षेत्र राज्य सरकारने इतर राज्यांप्रमाणे एक्सपायरी डेट जवळ आलेल्या लसीच्या कुप्या बदलून का घेत नाही असा सवाल करत आहे. मुंबईत तीन उपनगरे आणि परळमध्ये लसीचे डोस (Corona Vaccine Dose) वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. तर पुण्यात पाच केंद्रावरील तब्बल 2806 कोव्हिशिल्डच्या डोसची एक्सपायरी डेट उलटून गेली.

Maharashtra nearly 2.4 lack Covid vaccine doses most likely gone in garbage bin
Hate Speech : फेसबुककडून भारतातील 1 कोटीहून अधिक कंटेट पीसवर कारवाई

केंद्राकडून लस अदलाबदलीचे कोणतेही आदेश नाहीत : राज्य सरकार

येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील लाखो कोरोना लसीचे डोस फेकून द्यावे लागतील. चेंबुरमधील एका रूग्णालयाने सांगितले की 12500 कोरोना लसीच्या कुप्या ( एकूण 1.3 लाख डोस ) 5 मार्चला एक्सपायर होणार आहेत. पुण्याच्या सिव्हिल रूग्णालयाने सांगितेल की त्यांनी जवळपास 50 हजार डोस खासगी क्षेत्राला दान केले आहेत. पण हे सर्व येत्या 5 दिवसात वापरले जातील याची शक्यता नाही. असेच चित्र मुंबई पुण्यातील अनेक लसीकरण केंद्रावर आहे.

दरम्यान, खासगी क्षेत्राकडून केंद्राला विनंती केल्यानंतर फेब्रुवारी 23 ला केंद्राने सरकारने एक्सपायरी डेट जवळ आलेल्या लसींचे डोस हे खासगी केंद्रावरील एक्सापायरी डेट लांब असलेल्या डोसशी बदलून घेण्यात त्यांची काही हरकत नाही असा आदेश काढला. मात्र राज्य सरकारने याच्या उलटी भुमिका घेतली आहे. कोरोना लसीचे डोस दान केला जाऊ शकतात पण, डोसची अदालाबदली होणार नाही अशी भुमिका घेतली.

Maharashtra nearly 2.4 lack Covid vaccine doses most likely gone in garbage bin
Farmers Agitation : १७ गुन्हे मागे घेण्यास केजरीवाल सरकारची मंजुरी

याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, 'कोरोना लसीच्या कुपी सोडून इतर लसींच्या कुपींवर vaccine vial monitor चे स्टिकर असतात. जर या लसींचे डोस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना कोल्ड चेन ब्रेक झाली तर त्याच्या स्टिकरचा रंग बदलतो. मात्र कोरोना लसीबाबत ही पद्धत वापरली जात नाही. त्यामुळे लस ही शंभर टक्के कोल्ड चेन मार्फतच आली आहे की नाही याची शाश्वती नाही.' व्यास पुढे म्हणाले की खासगी क्षेत्रातील डोस वाया जाण्याला त्यांचे लस उत्पादकांबरोबर झालेला आर्थिक व्यवहार देखील कारणीभूत असू शकतो.

दुसरीकडे खासगी क्षेत्राकडून जर तामिळनाडू सारखे राज्य लसीच्या डोसची आदलाबदली करू शकते तर महाराष्ट्रात काय अडचण आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com