नाव बदलून केले 'मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट'

नाव बदलून केले 'मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट'

मुंबई - अनेकदा बाळाचे पाळण्यातले नाव आणि घरातले नाव वेगळे असते. त्याप्रमाणे नवजात बालकांसाठी "बेबी केअर किट योजने'चा शुभारंभ झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेला आता "मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट' म्हणून हाक मारावी, असे जाहीर केले. या योजनेचा आजचा शुभारंभदेखील "बेबी केअर किट योजना' या नावानेच आणि किटचे वाटप करण्यात आले तेदेखील बेबी केअर किट असे असतानादेखील अचानकपणे महिला व बालविकास मंत्र्यांनी या योजनेचे नामांतर अचानकपणे केले आहे. 

नवजात बालकांसाठी "बेबी केअर किट योजने'च्या शुभारंभाचा कार्यक्रम आज मंत्रालयात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला मुंबईतील काही नवजात बालकांच्या मातांना आणि गरोदर महिलांना या किटचे वाटप करून या योजनेचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीदेखील "बेबी केअर किट' या नावाने मिळालेली असताना अचानकपणे या योजनेचे नाव बदलण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेबाबत वित्त विभागाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलेले असतानादेखील मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना रेटण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी मुख्यमंत्री कार्यालयाने मौन बाळगले असून, संबंधित योजनेचे नाव बदलण्याबाबत किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्याबाबत कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com