देशाला महासत्ता बनविण्याचे युवक प्रेरणास्थान

चला घडू देशासाठी : डॉ. कराड यांचा विश्‍वास; यिन समर यूथ समिटचे उद्‍घाटन
Inauguration of Yin Summer Youth Summit
Inauguration of Yin Summer Youth SummitSakal

औरंगाबाद - ‘‘युवकांचा देश अशी भारताची ओळख असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे. देशाला महासत्ता बनविणे, नवा भारत घडविण्याचे ध्येय युवकांची ठेवले पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची जिद्द ठेवली तर यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी युवकांना दिला.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) वतीने ‘चला घडू देशासाठी’ या दोन दिवसाच्या समर यूथ समिटचे उद्‍घाटन डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते शनिवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झाले.व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे निवृत्त प्रो. सुरेश पुरी, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके, द युनिक ॲकॅडमी पुण्याचे कार्यकारी संचालक पंकज व्हट्टे, करिअर मार्गदर्शक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विजय नवले यांची उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, ‘‘आजचा युवक नवनवीन संकल्पनेतून ट्रेंड झाला पाहिजे. युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. नवा भारत घडविण्याचा विचारधारा सुरू झाली आहे. त्यात युवकांनी सहभागी व्हावे.’’ अशा उपक्रमातून ज्या तरुणांचे व्यक्तिमत्त्व घडेल, ते देशासाठी उपयोगी घडेल, अशा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ‘यिन’चे प्रमुख संदीप काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी परभणी येथील ऐश्‍वर्या डावरे हिने भरतनाट्यम नृत्य सादर केले. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

तरुणांना सल्ला...

  • यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द असली पाहिजे. जिद्द असेल तर अडचणींवर मात करता येते.

  • ध्येय निश्‍चित करा, त्यादृष्टीने प्रयत्न करा.

  • नोकरी करण्यापेक्षा शेतीकडे वळा. रोजगार उपलब्ध करून देणारे व्हा.

  • नकारात्मकता सोडून सकारात्मक विचाराने पुढे जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com