मुलींच्या अपहरणात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

२०१८मधील स्थिती 
२,००० - अपहरण झालेल्या मुली 
१,४२२ - शोध लागलेल्या मुली
५७८  - न सापडलेल्या मुली
७,०४३- बेपत्ता झालेल्या महिला 
४,२६४ - शोध लागलेल्या महिला 
२,७७९- न सापडलेल्या महिला 

मुंबई - मुंबई शहरात २०१३ च्या तुलनेत २०१८ मध्ये मुलींच्या अपहरणाच्या संख्येत वाढ झाली आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या कालावधीत बेपत्ता झालेली एकूण ८२८ मुले, तसेच पाच हजार २४७ व्यक्ती सापडलेल्या नाहीत.

‘आरटीआय’ कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिस विभागाकडे २०१८ मध्ये मुंबईतील महिला आणि लहान मुले हरविल्याचा किंवा अपहरणाबाबतची माहिती मागवली होती. या माहितीनुसार २०१८ मध्ये एकूण एक हजार ४१ मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यातील आतापर्यंत ७९२ मुले सापडली आहेत; तर अजूनही २४९ मुलांचा थांगपत्ता लागलेला नाही. २०१८ मध्ये एकूण सहा हजार ४६३ पुरुष हरवले आहेत आतापर्यंत तीन हजार ९९५ पुरुष सापडले आहेत; तर अजून दोन हजार ४६८ पुरुषांचा शोध लागलेला नाही.

२०१८मधील स्थिती 
२,००० - अपहरण झालेल्या मुली 
१,४२२ - शोध लागलेल्या मुली
५७८  - न सापडलेल्या मुली
७,०४३- बेपत्ता झालेल्या महिला 
४,२६४ - शोध लागलेल्या महिला 
२,७७९- न सापडलेल्या महिला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in abduction of girls