मंदीच्या काळात चांदी! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई  - देशभरात "जीएसटी'बाबत संभ्रमावस्था असताना महाराष्ट्रात मात्र करमहसुलात समाधानकारक वाढ झाल्याने मंदीच्या काळातही राज्याच्या तिजोरीची चांदी झाल्याचे चित्र समोर आले आहे. 2017-18 च्या आर्थिक वर्षात राज्याच्या करमहसुलात मागील वर्षीपेक्षा तब्बल 25415 कोटी रुपयांची वाढ झाली असून, 12 हजार 500 कोटी रुपयांचा परतावा दिल्यानंतर 12 हजार 915 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त करमहसूल जमा झाला आहे. विक्रीकर विभागाच्या या उत्तम कामगिरीमुळे पंतप्रधान कार्यालयाने राज्याला पारितोषिक देऊन गौरवल्याने राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे. 

केंद्र सरकारने "एक देश एक कर' म्हणून "जीएसटी' लागू केल्यानंतर व्यापारी व विक्रीकर विभागात प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते. त्याबाबतची विवरणपत्रे भरणेही सहज शक्‍य नसल्याचा आक्षेप होता. मात्र, विक्रीकर विभागाच्या सक्षम कार्यप्रणालीने राज्याने बाजी मारत करमहसूल जमा करण्यात देशातल्या सर्व राज्यांना मागे टाकले आहे. 

राज्याचे करमहसूलचे उत्पन्न 2016-17 या आर्थिक वर्षात 90 हजार 525 कोटी रुपये इतके होते. हे सर्व उत्पन्न "व्हॅट'च्या स्वरूपात जमा झालेले होते. यासाठी आठ लाख 56 हजार 473 नोंदणीकृत व्यापारी होते, तर मार्च 2018 अखेर तब्बल 13 लाख 78 हजार 814 व्यापारी नोंदणीकृत झाले असून, त्यांच्याकडून एक लाख 15 हजार 940 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. 

"जीएसटी'च्या संभ्रमामुळे अद्यापही केंद्रीय विक्री कर, ऊस खरेदी कर, व्यवसाय कर, प्रवेश कर, ऐषोआराम करामधे कमालीची घट दिसत आहे. या करांच्या वसुलीत आगामी तिमाहीमध्ये प्रगती होण्याचे संकेत असून, त्यामुळे राज्याचे करमहसुलाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्याचा विश्‍वास अर्थ विभागातील सूत्रांनी व्यक्‍त केला.

Web Title: increase of about Rs. 12, 915 crores in the tax collection