शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी पशुधन वाढीबरोबरच दूध, अंडी आणि लोकर उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत ते बुधवारी बोलत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पशू दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.

Web Title: Increase the income of farmers - Chief Minister