पाणी घरात शिरल्यास नुकसानभरपाईत वाढ

Increased compensation if water enters the house
Increased compensation if water enters the house

मुंबई - राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णतः वाहून गेले असल्यास किंवा घराचे पूर्णतः नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तूंसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रतिकुटुंब ५ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) या अर्थसाहाय्याच्या रकमेत २०१९ या वर्षासाठी सरकारकडून वाढ केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागासाठी १० हजार रुपये प्रतिकुटुंब व शहरी भागासाठी १५ हजार रुपये प्रतिकुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे. या वर्षी २६ जुलै २०१९ नंतर ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरांमध्ये पाणी शिरले व ज्यांचे नुकसान झाले आहे, केवळ त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. 

विधवा-वृद्धांच्या अनुदानात वाढ
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसाहाय्यात ६०० रुपयांवरून एक हजार रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना अकराशे रुपये, तर दोन अपत्ये असणाऱ्या विधवांना बाराशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी एक हजार ६४८ कोटींच्या खर्चासही मंजुरी  देण्यात आली.

निवृत्तीवेतनात वाढ
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत समावेश होतो. योजनेतून अनुक्रमे ४०० रुपये आणि १०० रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत होते. मंत्रिमंडळाच्या आजच्या  निर्णयानुसार राज्याच्या अनुदानात प्रत्येकी ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता या योजनेतून लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये निवृत्तीवेतन  मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com