esakal | 'शिकार' होत असलेल्या राज्यांत वाघांच्या संख्येतील वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

'शिकार' होत असलेल्या राज्यांत वाघांच्या संख्येतील वाढ 

'शिकार' होत असलेल्या राज्यांत वाघांच्या संख्येतील वाढ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे संकेत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशात एका वाघाला ट्रॅक्‍टरखाली चिरडून आणि ठेचून ग्रामस्थांनी ठार केले. ओडिशात गेल्या आठवड्यात एका खड्ड्यात सापडलेला सांगाडा वाघाचा असल्याचे आता उघड झाले आहे. शिकाऱ्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप होत आहे. 

यापूर्वी अखेरची व्याघ्रगणना 2014 मध्ये झाली होती. त्यानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या सात राज्यांत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा समावेश होता. त्या वेळी ओडिशातील वाघांची संख्या कमी होती. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल 2010 ते 2014 या काळातील व्याघ्रगणनेची आकडेवारी मार्चमध्ये संसदेत सादर केली. 

2014 मधील गणनेत देशात 2226 वाघांचे अस्तित्व असल्याचे आढळले; 2010 मध्ये 1706 वाघांची मोजदाद झाली होती. म्हणजेच त्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत 30 टक्के वाढ झाली. वाघांच्या संख्येतील वाढीचा कल या वर्षीच्या गणनेतही कायम राहील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. 

महाराष्ट्रात 2010 मध्ये 169 वाघ होते; 2014 मध्ये त्यांची संख्या 12 टक्‍क्‍यांनी वाढून 190 वर गेली. उत्तर प्रदेश (2010 मध्ये 118 आणि 2014 मध्ये 117) आणि ओडिशा (अनुक्रमे 32 आणि 28) या राज्यांत मात्र वाघांची संख्या स्थिर होती. बहुतेक राज्यांत वाघांच्या संख्येत वाढ झाली, तर काही राज्यांत त्यांची संख्या स्थिर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. फक्त झारखंड या एकाच राज्यात वाघांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले होते. 

2014 मधील गणनेत वाघांची सर्वाधिक संख्या कर्नाटकमध्ये (406) असल्याचे आढळले होते. त्यानंतर उत्तराखंड (340), मध्य प्रदेश (308), तमिळनाडू (229), महाराष्ट्र (190), आसाम (167) आणि उत्तर प्रदेश (117) यांचे क्रमांक होते. 

स्रोत : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (मार्चमध्ये लोकसभेत दिलेले उत्तर) 

राज्य 2010 2014 कल 
शिवालिक-गंगेचा प्रदेश 
उत्तराखंड 227 (199-256) 340 वाढ 
उत्तर प्रदेश 118 (113-124) 117 स्थिर 
बिहार 8 28 वाढ 

मध्य भारत 
आंध्र-तेलंगणा 72 (65-69) 68 स्थिर 
छत्तीसगड 26 (24-27) 46 वाढ 
मध्य प्रदेश 257 (213-301) 308 वाढ 
महाराष्ट्र 169 (155-183) 190 वाढ 
ओडिशा 32 (20-44) 28 स्थिर 
राजस्थान 36 (35-37) 45 वाढ 
झारखंड 10 (6-14) 3? घट 

पश्‍चिम घाट 
कर्नाटक 300 (280-320) 406 वाढ 
केरळ 71 (67-75) 136 वाढ 
तमिळनाडू 163 (153-173) 229 वाढ 
गोवा - 5 वाढ 

ईशान्य-ब्रह्मपुत्रेचे मैदान 
आसाम 143 (113-173) 167 वाढ 
अरुणाचल प्रदेश - 28 वाढ 
मिझोराम 5 3? स्थिर 
वायव्य बंगाल - 3 - 
सुंदरबन 70 (64-90) 76 (92-96) स्थिर 

एकूण 1706 (1520-1909) 2226 (1495-2491) वाढ 
 

loading image