'हे' दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर...

NCP-LOGO.jpg
NCP-LOGO.jpg

मुंबई : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. पण मागील काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी गेले. आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता आमदार राऊत हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. 

राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने यापूर्वी भाजपाला पाठिंबा दिलेले अनेक अपक्ष आता महाविकास आघाडीकडे वळू लागलेत. राजेंद्र राऊत यांच्यासोबतच लोहा- कंधारचे श्यामसुंदर शिंदे यांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. 

अपक्ष निवडून आलेले आमदार यांचा कल राष्ट्रवादी आणि सेनेकडे जाण्याचा आहे. त्यामुळे सत्तेत वाटा आणि आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत या दृष्टीने सत्तेत जाण्याच्या निर्णय काही अपक्ष आमदार यांनी घेतला आहे.  सोलापूर येथील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजा राऊत हे राष्ट्रवादी वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभेत महाआघाडी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राऊत हे अनुपस्थित होते. 

बार्शीचे राजकारणच मुळातच व्यक्तिकेंद्रित चालते. १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने राऊत यांना बार्शीतून विधानसभेची उमेदवारी दिली. पुढे २००४ साली दुसऱ्यांदा लढताता ते आमदार झाले. परंतु नंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राऊत हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर २००९ साली विधानसभा लढविली. बदलते राजकीय हवामान लक्षात घेऊन राऊत यांनी काँग्रेस सोडली व पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सेनेच्या तिकिटावर त्यांनी 2014 ची विधानसभेची निवडणूक पुन्हा लढविली. 2019 मधून अपक्ष म्हणून उभे राहिले आमदार राजेंद्र राऊत हे जिकडे सत्ता असते तिकडे जात असतात. त्यामुळे भाजपात असताना त्यांनी सत्ता भोगली. आता भाजपची सत्ता येऊ शकत नसल्याने राऊत हे राष्ट्रवादी वाटेवर आहेत. तसेच माजी आमदार दिलीप सोपल हे सेनेत गेल्याने बार्शीमध्ये राष्ट्रवादीला चेहरा नाही. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला आहे

खरे तर दोन वर्षांपूर्वी  त्यांनी बदलते राजकीय हवामान लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून 2019 ची उमेदवारी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र भाजप-सेऩेच्या जागा वाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. अपक्ष निवडून येताच अंदाज घेऊन त्यांनी आधी भाजपाला पाठिंबा दिला. मात्र आता भाजपची सत्ता येऊ शकत नसल्याने राऊत हे राष्ट्रवादीचा पर्याय निश्चित करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com