पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय 

सिद्धेश्‍वर डुकरे 
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय होणार असल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकार दरबारी वेगाने पावले उचलली गेली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या निर्मितीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून; उद्या (ता. 10) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. याबाबतचे सादरीकरण मंत्रालयात झाले असल्याचे सूत्रांकडून समजते. 

औरंबाद, नाशिक, सोलापूर आदी शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड या वेगाने वाढलेल्या शहरांत गुन्ह्यांचेही प्रमाण वाढल्याचे गृह खात्याच्या लक्षात आले. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने झालेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड या शहरांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्‍तालय होण्याची गरज असल्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास अहवालास गृह खात्याने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी अतिरिक्‍त पोलिस महासंचालक दर्जाचा पोलिस अधिकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या आयुक्‍तालयाच्या कार्यक्षेत्रात 2011 च्या जणगणनेनुसार 17 लाख लोकसंख्येच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न हाताळला जाणार आहे. आयुक्‍तालयासाठी वर्षाला सुमारे 400 कोटी रुपयांच्या खर्चांची तरतूद करण्यात येणार आहे. पुणे आयुक्‍तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस विभाग यातील 15 पोलिस ठाण्यांचा समावेश करून हे आयुक्‍तालय निर्माण करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयांतर्गत येणारी पोलिस ठाणी 
देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी, चाकण, आळंदी, चिखली, भोसरी एमआयडीसी. 

Web Title: Independent police headquarters for Pimpri-Chinchwad