जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीचा मान भारत-इजिप्तला : राज्यपाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

याठिकाणी हस्तकला वस्तू प्रदर्शन आणि चित्रप्रदर्शनही भरविण्यात आले. 'द कैरो ऑपेरा हाऊस बॅलेट'मार्फत इजिप्तच्या पारंपरिक नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले.

मुंबई : भारत आणि इजिप्त या जगातील दोन प्राचीन संस्कृती आहेत. विविध महोत्सवांच्या माध्यमातून होणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी (ता.18) केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'इजिप्त- बाय द गंगा' या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अरब रिपब्लिक ऑफ इजिप्तच्या भारतीय दूतावासामार्फत दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे.

- महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ''सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. तसेच या प्रकारचे महोत्सव इजिप्तमध्येही आयोजित करण्यात यावेत, ज्यामुळे तेथे भारतीय कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि भारतीय संस्कृती आखाती देशांमध्येही पोहोचेल.''

- भाजपवासी हर्षवर्धन पाटलांमुळे जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट

मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी हस्तकला वस्तू प्रदर्शन आणि चित्रप्रदर्शनही भरविण्यात आले. 'द कैरो ऑपेरा हाऊस बॅलेट'मार्फत इजिप्तच्या पारंपरिक नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले.

- मराठा आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ मांडणार राज्य शासनाची बाजू

महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी इजिप्तच्या भारतातील राजदूत डॉ. हेबा बरासी, इजिप्तचे मुंबईतील कौन्सुलेट जनरल अहमद खलील, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या प्रादेशिक प्रमुख रेणू प्रितियानी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India and Egypt are the worlds Ancient culture says Governor Bhagat Singh Koshyari