#IndiaToEndia या ट्विटरवरील ट्रेंडचे 'हे' आहे कारण...

India to endia hashtag trending on twitter
India to endia hashtag trending on twitter

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्याला ईशान्येकडील राज्यांमधून तीव्र विरोध झाला. त्यानंतर या कायद्याची विरोधातील आंदोलनाची धग दिल्लीला बसली. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात कॅब विरोधात हिंसक आंदोलन झाले. तसेच उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठातही पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काही आंदोलनकर्ते तर काही पोलिसही जखमी झाले आहेत. या सगळ्याचा परिणाम सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात होत असनू ट्विटरवर #IndiaToEndia असा हॅशटॅग सुरू झालाय. 

भारतातील ही हिंसक परिस्थिती बघून इतर देशातून #IndiaToEndia हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तर काही ट्विटमध्ये भारताची तुलना सिरीयाशी केली जात आहे. तर असेच चालू राहिले तर इंडियाचा 'End'ia व्हायला वेळ लागणार नाही, अशा आशयाचे ट्विटसही या ट्रेंडमध्ये दिसून येत आहेत. तर काही ट्विटमध्ये भारत विविध भागांमध्ये विभागलेला दाखविण्यात आला आहे. तर काही जणांच म्हणणे आहे की, ही फक्त सुरवात आहे. पुढे अजून खूप काही होणे बाकी आहे. तर याला विरोध करणारेही काही ट्विटर भारतातील नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत.

जामीया मीलिया व अलीगढ विद्यापीठात लाठीचार्ज होत असतानाच देशातील इतर महाविद्यालयातून या लाठीचार्जचा विरोध केला जात आहे. लखनौ, मुंबई, कोलकाता या शहरातही या आंदोलनाचे पडसाद बघायला मिळत आहेत.    

नक्की काय घडले?
दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी विद्यार्थ्याांच्या आंदोलनात 12 पोलिस जखमी झाले होते. शनिवारपासून या आंदोलनाची धग आणखी वाढली. आंदोलक आणि पोलिस दक्षिण दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत आमने-सामने आले होते. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच दिल्ली ट्रान्सपोर्टची बस पेटवून दिली. यात एक पोलिस आणि अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. यावरून आता आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस सायमन फारूकी याने पोलिसांवर आरोप केला आहे. आंदोलक शांततेने मथुरा रोडवर आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात चकमक झाली, असा आरोप फारुकी यांनी केलाय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com