बडगाम विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचा पायलट हुतात्मा

बडगाम विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचा पायलट हुतात्मा

नवी दिल्ली- सकाळच्या सुमारास भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं होतं. या दुर्घटनेत नाशिकच्या वैमानिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे असं वैमानिकाचं नाव आहे. ते मुळचे नाशिकचे रहिवासी होते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.  

नाशिकचे निनाद हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. (एसपीआय ही जास्तीत जास्त मराठी मुलांची सैन्यधिकारी म्हणून निवड व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली संस्था) तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून रुजू झाले. बुधवारी सकाळी विमानाच्या अपघातात निनाद शहीद झाले.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com