पुणे : लसीकरणात भारत आत्मनिर्भर; नऊ महिन्यात १०० कोटी डोस दिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharati Pawar

लसीकरणात भारत आत्मनिर्भर; नऊ महिन्यात १०० कोटी डोस दिले

पुणे : पूर्वी देशामध्ये लसी बाहेरून आणल्या जायच्या, अनेक वर्ष वाट पहावी लागायची. पण आता ९ महिन्यात १०० कोटी नागरिकांना लस दिली आहे. हा आत्मनिर्भर भारत आहे. लसीचा तुटवडा आहे म्हणून कोव्हीशील्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जात आहे हे म्हणण्यात अर्थ नाही. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर हे निर्णय होत असतात, अशी टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विरोधकांवर केली.

राज्यमंत्री डॉ. भारती पवार  यांनी आज (सोमवारी) महापालिकेला भेट देऊन कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: व्हायरल झालेलं दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बनावट - CBSE

भारती पवार म्हणाल्या, ‘‘रुग्ण संख्या कमी झालेली असली तरी महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत, अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. त्यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. देशात १०० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण होत आहे. लहान मुलांसाठी लस उपलब्ध व्हावी यासाठी ट्रायल सुरू आहेत, पण ही लस कधी येऊ शकेल हे सांगता येणार नाही. लसीचा तुटवडा कमी आहे म्हणून कोव्हीशील्डचा ८४ दिवसाचा निर्णय घेतला आहे हे म्हणणे योग्य नाही. डाॅक्टर, शास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर त्यांच्याकडील माहितीनंतर हा निर्णय झाला आहे. कोणत्या राज्याने मागणी केली होती म्हणून हा कालावधी कमी होणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

लोकल बाबत सूचना दिल्या नाहीत

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे, त्यावर पवार म्हणाल्या, ‘‘एक डोस घेतल्यानंतर नागरिकांमध्ये किती ॲटीबॉडी तयार होतात, दोन डोस नंतर किती होतात याचा अभ्यास तज्ज्ञ करतात, त्याच्या अहवालानंतर परवानगी दिली जाते. केंद्र सरकारने एका डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास सुरू करण्याची सूचना दिलेली नाही. यामध्ये राजकीय विधान करून जमणार नाही. हे नियम तज्ज्ञांच्या अभ्यासावरून ठरतात.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिल्लीत बैठक

पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे आला आहे. यास मान्यता देण्यासाठी साठी लवकरच दिल्लीत बैठक घेतली जाईल, असे भारती पवार यांनी सांगितले.

Web Title: India Self Sufficient In Vaccination 100 Crore Dose In Nine Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiavaccination