सरकारकडून आता देशी गाईंचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ गायी आणि म्हशींच्या वाटप योजनेत देशी गायींचे वाटप करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आता या योजनेतून गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या देशी गोवंशाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली.

उमाप म्हणाले, ‘‘देशी गोवंशाबाबत समाजात जागरूकता वाढत आहे. अनेक सुशिक्षित तरुण, तरुणी या व्यवसायात येत असून, गायी आणि म्हशींच्या गट वाटप योजनेत देशी गोवंशाचा समावेश नव्हता. त्यामुळे अनेक नवउद्योजकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे देशी गोवंशाचा समावेश या योजनेत करावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, यामुळे  विविध देशी गोवंशाचे वाटप या योजनेतून होणार आहे. या योजनेत सहा, चार दोन गायींचे वाटप करण्यात येणार आहे.

मी कोकणात सेंद्रिय शेती करत आहे. सेंद्रिय शेतीसाठी देशी गोवंशाचे शेण आणि गोमूत्र महत्त्वाचे असून, या योजनेच्या लाभ मला घेता येईल. परिणामी देशी गोवंशाच्या संवर्धनातून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला फायदा होईल.
- केतकी फाटक-पाटील, करंबळे तर्फे देवळे, ता. संगमेश्‍वर, रत्नागिरी

Web Title: Indian Cow Distribution by Government