तुम्ही इंडेन गॅस वापरताय? मग ही बातमी नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

जर ग्राहकांच्या क्रमांकाची आधीपासूनच इंडेन रेकॉर्डमध्ये नोंद असल्यास आयवीआरएस 16-अंकी ग्राहक आयडी सूचित करेल. या ग्राहक आयडीचा उल्लेख ग्राहकांच्या इंडेन एलपीजीच्या पावत्या, कॅश मेमोवर असेल.

पुणे : सध्या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांच्या सुविधेसाठी इंडियन ऑईलने देशभरात इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी एक क्रमांक सुरु केला आहे. एलपीजी रिफीलसाठी बुकिंग क्रमांक 7718955555 हा असून, तो ग्राहकांसाठी 24 बाय 7 उपलब्ध असेल. 

पेट्रोलियम कंपनी म्हणतेय, 'गॅस सिलिंडरचे अनुदान सुरूच!'​

ग्राहक राज्यभरात एका टेलिकॉम सर्कलमधून दुसऱ्या टेलिकॉम सर्कलमध्ये गेले तरी त्यांचा इंडेन रीफिल बुकिंग क्रमांक हा सारखाच राहील. इंडेन एलपीजी रिफिल बुकिंगसाठी सध्याची टेलिकॉम सर्कल-स्पेसिफिक फोन नंबरची प्रणाली 31 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीनंतर बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर एलपीजी रिफिल बुकिंगसाठी 7718955555 हा क्रमांक लागू करण्यात येईल. इंडेन एलपीजी बुकिंग ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करुनच करता येईल. 

पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच​

जर ग्राहकांच्या क्रमांकाची आधीपासूनच इंडेन रेकॉर्डमध्ये नोंद असल्यास आयवीआरएस 16-अंकी ग्राहक आयडी सूचित करेल. या ग्राहक आयडीचा उल्लेख ग्राहकांच्या इंडेन एलपीजीच्या पावत्या, कॅश मेमोवर असेल. ग्राहकांच्या पुष्टीनंतर रिफिल बुकिंग स्वीकारले जाईल. इंडेन एलपीजी संबंधित अधिक माहितीसाठी ग्राहकांनी https://cx.indianoil.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन इंडियन ऑइल-पश्‍चिमी क्षेत्राच्या महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अंजली भावे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Oil has launched a number for Indane LPG refill booking across the country