अखेरच्या श्वासापर्यंत सिंधूताईंना होती फक्त अन् फक्त मुलांची काळजी

Sindhutai Sapkal
Sindhutai Sapkal Sindhutai Sapkal FB

आयुष्यातील संघर्षमय प्रवासातून खंबीरपणे उभा राहुन अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधूताई सपकाळ (sindhutai sapkal mother of orphans) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये (Pune) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दिडमहिन्यांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनानंतर निकटवर्तीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंधूताई सपकाळ यांच्या अखेरच्या भेटीतील काही गोष्टी सांगितल्या. गेल्या दिड महिन्यांपासून त्या रुग्णालयात आहेत. याकाळात प्रकृतीमध्ये चढउतार होत असताना सिंधूताईना मुलांची काळजी असल्याचे सतत जाणवत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली. त्यावेळी त्या व्यवस्थितीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी मुलांची विचारपूस केली. सर्व मुले ठिक आहेत का? त्यांची काळजी घ्या. त्यांना कोणताही त्रास होऊ देऊ नका, असे सिंधूताई बोलल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Sindhutai Sapkal
मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली

सिंधूताईंच्या लेकीचं भावूक आवाहन

सिंधूताई सपकाळ यांच्या निधानानंतर त्यांच्या कन्या ममता सपकाळ यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माई गेल्या हे शब्द वापरू नका, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. माईनं जो वसा घेतलाय तो पुढेही सुरु ठेवू. सध्याच्या घडीला मोठा धक्का बसला आहे. त्याच कार्य पुढे घेऊन जाताना त्या कायम आमच्यासोबत असतील, शब्दांत ममता सपकाळ यांनी व्यक्त केल्या.

Sindhutai Sapkal
स्मशानात चितेवर भाजलेली भाकरी ते पद्मश्री; सिंधूताईंचा प्रवास थक्क करणारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com