राज्यातील उद्योगांनी कामगार कपात करू नये - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 July 2020

मनुष्यबळाची गरज भागवावी
महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भूमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे; तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होताना घराघरांत समाधान नांदावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई - राज्यातील उद्योगांनी कामगार कपात करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या पोर्टलद्वारे स्थानिकांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, की पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हेही सांगितले जावे. 

मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राची अट यासाठी असणार आहे. 
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industries in the state should not cut workers uddhav thackeray