पुणे : नपुंसक असल्याची माहिती पत्नीपासून लपविली अन्...

Information about being impotent was hidden from the wife
Information about being impotent was hidden from the wife

पिंपरी : पती नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवत लग्न लावून देत विवाहितेची फसवणूक केली. यासह लग्नानंतर माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरा व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माहेराहून पाच लाख रूपये घेवून ये नाहीतर माहेरी निघून जा, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करीत नांदविण्यास नकार दिला.

झारखंड निवडणुकीला हिंसक वळण; गोळीबारात एक जण ठार

फिर्यादीच्या आई-वडिलांनी लग्नामध्ये मानपान न केल्याचा राग मनात धरून आरोपींनी विवाहितेला माहेरी सोडले. तसेच पती नपुंसक असल्याची माहिती सासरच्या मंडळींनी लपवून ठेवली. लग्न झाल्यापासून पतीने विवाहितेला वैवाहिक सुख दिले नाही. याउलट त्याचे एका व्यक्तीसोबत सुरू असलेल्या अनैर्गिक संबंधांबाबतचे फोटो व व्हिडीओ विवाहितेला पाठविले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्या मंडळींवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com