घोड्यावर बसण्यापूर्वी आता हेल्मेट घाला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

माथेरान - येथे पर्यटक घोड्यावरून पडण्याच्या दुर्घटना लक्षात घेता माथेरान पोलिस ठाण्याने अश्‍वारोहणासाठी हेल्मेटची सक्ती केली आहे. त्यास अश्वचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत हेल्मेटचा वापर सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी परदेशी पर्यटक इंडिया गेविन मार्क मेव्ह्यू व मुंबईतील ग्रॅंट रोड येथील रशिदा रेडिओवाला या दोन लहान मुली घोड्यावरून पडून जखमी झाल्या. माथेरान पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी नुकतीच अश्वपालकांची बैठक बोलावली होती. त्या वेळी पर्यटकांच्या सुरक्षेस्तव हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला. हेल्मेट खरेदी करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळावा, अशी विनंती अश्वचालकांनी पोलिसांकडे केली होती. काही अश्वचालकांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्‍यावरील घोडेवाले पर्यटकांना घेऊन रस्त्याऐवजी रेल्वेमार्गावरून जातात. लोहमार्गात घोड्याचा पाय अडकून पर्यटक गंभीर जखमी होण्याची शक्‍यता असल्याने अशा घोडेवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी  बजावले आहे.

Web Title: insert helmet before horse riding in matheran