विमा कंपनी अशी करते शेतकऱ्याची फसवणूक

विमा कंपनी अशी करते शेतकऱ्याची फसवणूक

मुंबई -  सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपण आपण एका प्रख्यात विमा कंपनीत काम करत असल्याचा दावा करत आहे, सोबत ती व्यक्ती ओळखपत्र ही दाखवत आहे.  या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आपली विमा कंपनी ही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे सांगत आहे.

ही विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे हे पटवून देताना या व्यक्तीने म्हटले आहे की, या कंपनीने एका राष्ट्रीयकृत बँकेसोबत टायअप केलेले आहे. 

या तरुणाने बँकेकडून खोट्या सह्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही केला आहे. या व्यक्तीने आपल्या सिनिअर मॅनेजर सोबत बोलूनही काही फायदा झाला नसल्याचे सांगताना त्यांच्यासोबत झालेले संभाषण टेपरेकॉर्डर ही ऐकविले आहे.  

ही विमा कंपनी मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप या तरुणाने या व्हिडिओमध्ये केलेला आहेत, याचे पुरावे म्हणून या तरुणाने काही कागदपत्रेही सोबत दाखवली आहेत. या संबंधी वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याचेही या तरुणाने स्पष्ट केले आहे. एकूणच या तरुणाने व्हिडिओमध्ये विमा कंपनीच्या विरोधात पूर्णपणे संताप व्यक्त केलेला आहे.

विमा कंपन्यांच्या आणि अन्य लोकांच्या लुटीमुळे शेतकरी आत्महत्या करताहेत. हे आरोप सत्य असून यात कुठलेही चुकीचं नाही जर तुम्हाला चुकीचं काही वाटत असेल तर मी माझा मोबाईल क्रमांक दिला आहे, यावर तुम्ही संपर्क करून खात्री करून घेऊ शकता असेही या तरुणाने म्हटले आहे. हेच काय आणखी खूप सारे माझ्याकडे विमा कंपन्यांच्या फ्रॉडविषयी पुरावे असल्याचेही या तरुणाने सांगितले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर या विमा कंपन्यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com