विमा कंपन्यांना अल्टिमेटम - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसून, शिवसेनेने याविरोधात मुंबईत आज मोर्चा काढला. हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारती ॲक्‍सा कंपनीवर धडकला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी युवा सेनेचे आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्याच पाहिजेत. कर्जमाफी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे बॅंकांनी नोटीस फलकावर 
लावली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance Company Ultimate Uddhav Thackeray Politics