गो डिजिटली... फॉर मार्केटिंग!

‘इंटरनेट’ मुळे तरुणाईसाठी करिअर संधींचे भव्य दालन खुले झाले आहे
Internet career opportunity go digitally for marketing
Internet career opportunity go digitally for marketingsakal

गेल्या काही वर्षांत डिजिटल मार्केटिंग ही संज्ञा जवळजवळ सर्वांनाच माहीत झाली आहे. जसजसे ‘इंटरनेट’ च्या माध्यमातून जग झपाट्याने जोडले गेले, तसतसे ‘इंटरनेट’ हे माध्यम आपल्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी किती प्रभावीपणे वापरले जाऊ शकते याची सर्वांनाच जाणीव झाली आणि त्यातूनच उगम झाला ‘डिजिटल मार्केटिंग’ या नवीन क्षेत्राचा! आज यामुळे तरुणाईसाठी करिअर संधींचे भव्य दालन खुले झाले आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आपण ‘इंटरनेट’ शी जोडू शकतो त्या त्या उपकरणांच्या माध्यमातून आपल्या कंपनीचे केलेले प्रमोशन, ब्रँडिंग किंवा कंपनीच्या उत्पादनाची विक्री! पारंपारिक मार्केटिंग पद्धतीमध्ये या सर्वच गोष्टी माणसांना प्रत्यक्ष भेटून कराव्या लागत होत्या. परंतु, आता इंटरनेटमुळे एका क्लिकवर या सगळ्या गोष्टी घडू शकतात. एवढेच नव्हे तर कमीत कमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगला आता अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोणत्याही कंपनीचा किंवा संस्थेचा ‘मार्केटिंग’ हा कणा असतो. कंपनी उत्पादन तयार करणारी असो किंवा सेवा पुरविणारी असो; लहान असो किंवा मोठी असो... तिच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग या नवीन तंत्राचा वापर आता भारतासह जगात सर्वत्र दिसून येतो. लघु व मध्यम उद्योगांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वजण या नव्या तंत्राने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनीमध्ये आता डिजिटल मार्केटिंग हे जणू काही अपरिहार्यच झाले आहे.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंगमध्ये केला जातो. या तंत्राचा वापर करून कंपनीचे उत्पादन व सेवा फक्त ग्राहकांपर्यंत पोहोचवल्याच जात नाही; तर यशस्वीपणे त्यांची विक्रीही केली जाते.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच डिजिटल मार्केटिंगचा आवाकाही वाढत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे वेगाने बदलणारे आणि करिअर संधींचा प्रचंड मोठा खजिना असलेले क्षेत्र आहे. येत्या काळात भारतात देखील डिजिटल मार्केटिंगमधील करिअर संधी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे!

अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा
अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com