'असहिष्णुता समाजातील सर्वच घटकांत सारखीच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

ठाणे - हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांवर असहिष्णुतेचे आरोप केले जात आहेत. असे असले तरी समाजातील सर्वच घटकांत ती सारखीच दिसून येते. एखाद्या व्यक्तीला विरोध करताना त्यांच्यावर जातिवाचक टिप्पणी हेही असहिष्णुतेचे लक्षण आहे, असे मत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. 

29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी "भारतातल्या समाज सुधारणा : विविध प्रयत्न' या विषयाच्या परिसंवादाच्या वेळी त्या बोलत होत्या. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमधील या कार्यक्रमा दरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह डॉ. अशोक मोडक, ऍड. किशोर जावळे मंचावर होते. सावरकरांचे विचार अतिशय कृतिशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सावरकारांनी सात बंदी तोडण्यात महत्त्वाचे काम केले. मात्र समाजात आजही या बंदींचे काही अवशेष शिल्लक असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. देशातील अनेक गरीब नागरिकांना त्यांचे अज्ञान आणि गरिबीचा फायदा घेऊन फसवून धर्मांतर केले जाते. त्यासाठी धर्मांतर रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज या वेळी गोऱ्हे यांनी व्यक्त केली. परिस्थितीला घाबरून आत्महत्या करण्यापेक्षा सावरकरांच्या विचाराप्रमाणे सशस्त्र क्रांती करावी, असेही त्या म्हणाल्या. समाजातील अनिष्ट रूढी रोखण्यासाठी सरकारने वाट बघायला लावू नये. 

Web Title: Intolerance is the same in all the elements of society