Anand Dighe: 'आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा', घातपाताचा संशय व्यक्त करत शिंदे गटाच्या नेत्याने केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena anand dighe

Anand Dighe: 'आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा', घातपाताचा संशय व्यक्त करत शिंदे गटाच्या नेत्याने केली मागणी

आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे. यामुळेराजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, ठाण्यातील प्रत्येक घरात आनंद दिघे यांना दैवत मानलं गेलं आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशी मागणी आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी याबाबतची चौकशी केली पाहिजे. (Latest Marathi News)

अनेकांच मत आहे कि, आनंद दिघे यांचा अपघात नाही तर घातपात आहे. त्यांचा खून झालेला आहे. त्यांना एका दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येणार होतं, मग एक दिवस आधी काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. याची चौकशी झाली पाहिजे असं संजय शिरसाट यांनी केली आहे.(Marathi Tajya Batmya)

आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर अनेक संशय व्यक्त केले जात होते. आता संजय शिरसाट यांनी दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता त्यांचा रोख कोणाकडे आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.(Latest Marathi News)

कोण होते आनंद दिघे?

आनंद दिघे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत होते. बाळासाहेबांचे ते कट्टर समर्थक होते. बाळासाहेबांच्या सभांना ते जायचे. त्यामुळे ते बाळासाहेबांकडे आकर्षित झाले. शिवसैनिक म्हणून काम करू लागले. त्यांची धडाडी पाहून त्यांना पदं मिळत गेली. (Marathi Tajya Batmya)

ठाण्यासारख्या जिल्ह्यात आनंद दिघे यांनी फुलटाईम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. आनंद दिघे यांना कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं. ठाण्यातील शिवसेनेचे ते किंगमेकर होते.(Latest Marathi News)