Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

- मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली  

स्वातंत्र्यदिन 
मुंबई : स्वातंत्रदिनानिमित्त आणि जम्मू- काश्मीरमधील कलम 370 काढल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर 300 तर पश्चिम रेल्वेवर एक हजार रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल तैनात करण्यात येणार आहे.

आज साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिना निमित्त उपनगरीय रेल्वे सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपी सज्ज झालेले आहे. आरपीएफने उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.

प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली जात आहे. यासह प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर किंवा लोकलमध्ये संशयित प्रवासी, संशयित वस्तू दिसल्यास सुरक्षा विभागाला कळविण्याचे आवाहन देखील पोलीसांनी केले आहे.

रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, दादर आणि मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर, भांडुप स्थानकावर तपासणी सुरू केली आहे. उपनगरी रेल्वे स्थानकांवर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर फटका गॅग आणि रेल्वे परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेवर 300 तर आणि पश्चिम रेल्वेवर एक हजार  आरपीएफ आणि जीआरपी तैनात करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation at the train station on Independence Day