शिवस्मारकाच्या कामात अनियमितता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

अरबी समुद्रात उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीत अनियमितता झालेली असून महालेखापालांनी (कॅग) उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली.

मुंबई - अरबी समुद्रात उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीत अनियमितता झालेली असून महालेखापालांनी (कॅग) उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे, महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत असे घडणे महाराष्ट्राला शोभणारे नसल्याने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे चव्हाण यांनी परिषदेत स्पष्ट केले. याबाबतचा मूळ प्रश्‍न राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांच्यासह इतर आमदारांनी उपस्थित केला 
होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irregularities in the work of Shivsmarak