चौकशीला सहकार्य करतोय - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - सिंचन गैरव्यवहारास तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार आहेत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केल्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मी बोलू शकत नाही; पण मी कालही चौकशीला सहकार्य केले असून, आजही करतोय आणि करत राहणार आहे,’ असे ते म्हणाले. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, की मी नेहमीच सांगतोय की कायदे आणि नियम सर्वांना सारखेच असतात. भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर त्यांनी उघड चौकशी केली. ज्या वेळेला चौकशीसाठी बोलवले किंवा प्रश्नावली पाठवली, तेव्हाही मी उत्तरे दिली आहेत. चौकशीसाठी सहकार्य करतच आहे. सरकार आपले काम करते आहे.

Web Title: Irrigation Scam Inquiry Support Ajit Pawar Politics