इशरतप्रकरणी मोदी-शहांना गोवण्याचा आदेश होता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - ‘इशरत जहाँ प्रकरणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फ्रेम करा, मॅडमची तशी इच्छा आहे, असे ज्येष्ठ पोलिस अधिकारी रणजित सिन्हा सांगत असत,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृह खात्याचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी केले. ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बुधवारी ते बोलत होते. 

मणी म्हणाले की, जे दिसत आहे त्याच्या पलीकडचे काहीतरी कसे सांगणार, असे प्रतिज्ञापत्र आपण उच्च न्यायालयात सादर केले आहे, अशी माहिती दिल्यावर वरिष्ठ दबाव टाकत. आपले कुटुंबीय या काळात अनन्वित अत्याचाराला सामोरे गेले अन वृद्ध आईचा यातच अंत झाला; पण देशसेवा करण्यास आपण सर्वोच्च प्राधान्य दिले. यावेळी निवृत्त जनरल दत्तात्रेय शेकटकर, अनुवादकार अरुण करमरकर उपस्थित होते. 

‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द मतांच्या राजकारणासाठी प्रत्यक्षात आला. कर्नल पुरोहित यांच्यासारख्या उत्तम लष्करी अधिकाऱ्याला कटात गोवले गेले, अशी माहिती मणी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. मोदी आणि शहा यांना आपण इशरत प्रकरणात गोवून दाखवू, अशी सिन्हा यांची मॅडमशी ‘कमिटमेंट’ होती, असा सनसनाटी आरोपवजा माहितीही त्यांनी या वेळी दिली. मॅडम म्हणजे कोण याबद्दलचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

Web Title: Ishrat jahan Case Narendra Modi Amit Shaha RVS mani