खेळण्यांची विक्री करणाऱ्यांनो सावधान ! दर्जाशी ‘खेळणं’ पडणार महाग !

The ISI sign is mandatory on toys other vise Sentenced to two years imprisonment
The ISI sign is mandatory on toys other vise Sentenced to two years imprisonment

पुणे : खेळण्यांची विक्री करणाऱ्यांनो सावधान ! आता लहान-मोठ्या खेळण्यांवर इंडियन स्टॅण्डर्ड इन्स्‍टिट्यूटचे (आयएसआय) चिन्ह असल्याशिवाय त्यांची विक्री करता येणार नाही. आयएसआय चिन्हाशिवाय खेळण्यांची विक्री केल्यास दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा आता होऊ शकते. शिवाय दंड वेगळा. उत्पादक, वितरक, घाऊक वितरक आणि छोटे-मोठे विक्रेतेही आता या कायद्याच्या कक्षेत आले आहे.

खेळण्यांच्या बाजारपेठेवर चीनी उत्पादकांचा वरचष्मा आहे. तो मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डच्या (बीआयएस) कायद्यात बदल करून ‘क्वालिटी कंट्रोल ऑर्डर २०२०’ हा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आता खेळण्यावर ‘आयएसआय’चे चिन्ह असल्याशिवाय त्यांची विक्री करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. अध्यादेशाबद्दल माहिती होण्यासाठी गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात जागरूकता निर्माण करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता एक जानेवारीपासून या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

अंमलबजावणी सुरू
- हस्तकलेतून तयार केलेली खेळणी वगळता प्लॅस्टिक, लाकडी खेळणी तसेच सॉफ्ट टॉईज आदी प्रकारच्या लहान-मोठ्या खेळण्यांना ‘आयएसआय’चे बंधन
- पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रमध्ये १४ जिल्ह्यांतील उत्पादकांना नोटिसा पाठविण्यास सुरवात
- नव्या कायद्याच्या माहितीसाठी विमानतळ, मॉल, प्रमुख वितरकांना पत्रे पाठविण्यास सुरुवात

हे लक्षात ठेवा
खेळण्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री, प्रदर्शन करणे आदींसाठी त्यावर ‘आयएसआय’ चिन्ह बंधनकारक करण्यात आले आहे. नेहमीच्या पद्धतीनेच उत्पादकांना ‘आयएसआय’चे प्रमाणपत्र मिळू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा



वार्षिक शुल्क
- मोठे उत्पादक - ९८ हजार रुपये
- लघु उद्योग - ७९ हजार रुपये
- सूक्ष्म उद्योग - ५९ हजार रुपये

धोकादायक खेळण्यांमुळे लहान मुलांना अनेकदा अपघात झालेले आहेत. तसेच चीनमधून आयात केलेल्या खेळण्यांचा दर्जाही चिंताजनक आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने खेळण्यांवर ‘आयएसआय’चे चिन्हे असावे, असे बंधनकारक केले आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी बीआयएसकडून सुरू करण्यात आली आहे.
- हेमंत अडे, पुणे विभाग प्रमुख, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीएसआय)

नवा नियम आमच्यापर्यंत अद्याप पोचलेला नाही. परंतु, चीनमधून येणारी खेळणी आता बंद झाली आहेत. काही प्रमाणात चीनी माल उपलब्ध होतो परंतु, त्यांची किंमत जास्त आहे. भारतीय माल आता मिळू लागला आहे. परंतु, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे त्यांचीही किंमत वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात ३० रुपयांना मिळणाऱ्या खेळण्याची किंमत आता ५० रुपयांपर्यंत पोचली आहे.
- सुरेश जैन, खेळण्यांचे व्यापारी
पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com