Vidhan Sabha 2019 : शिवरायांचे धडे वगळल्याने राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांना टोला

Devendra-Fadnavis-BJP
Devendra-Fadnavis-BJP

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यावरून राज्यभरात सगळीकडे रान पेटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता राज्य सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका सातत्याने होत होती. मात्र, राज्य सरकारच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानेही त्यांचा कित्ता गिरवला आहे. 

महाराष्ट्राची ओळख, अस्मिता, संस्कृती आणि इतिहास याची जगाला ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरवात केली होती. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव त्यावेळी विधीमंडळात मंजूर करण्यात आला होता. 

त्यानंतर अनेक सरकारे बदलली. मात्र, अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण, शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यात सत्ता मिळवणाऱ्या महायुती सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपल्या ट्विटर हँडलवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात इयत्ता चौथीचे पुस्तक दाखविण्यात आले असू 'आम्हांला गडकिल्ल्यांवरील हॉटेलचा इतिहास नव्याने लिहायचा आहे,' असे एक कॅप्शनही दिलं आहे.  

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयालाही विरोधी पक्षांनीच नव्हे, तर जनतेनेही कडाडून विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी सरकारने शिवाजी महाराजांचा इतिहासच शैक्षणिक अभ्यासक्रमातून हटविला असल्याने सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com